गडकिल्ले आमुची शान
गडकिल्ले आमुची शान


स्वराज्याचे ध्येय बनूनी
राखली शिवशाहीची शान,
पराक्रमाच्या साक्षीला उभे
गडकिल्ले आमुचा अभिमान.
राजांच्या पायधुळीने पावन
गडकिल्ल्यांवरची माती,
कणखर ते बुरुज सांगती
जन्मोजन्मांची नाती.
जगदीश्वराच्या द्वारी शोभे
डौलाने उभा तो नंदी,
भल्याभल्यांना धडकी भरवी
गडाची भक्कम ती तटबंदी.
ज्यांनी पाहिले आपुल्या राजाला
असे ते इतिहासातील दुर्ग,
गडकिल्ल्यांमध्ये वसला आहे
भूतलावरील खरा तो स्वर्ग.
चला वंदू या त्या नरदुर्गांना
जपुनी गड संवर्धनाचा वसा
पिढ्यापिढ्यांना आदर्श ठरू द्या
शिवइतिहास देखणा असा