नोटा बंदीची व्यथा
नोटा बंदीची व्यथा


नोटबंदीच्या नावाखाली
झाल्या बंद साऱ्या वाटा
भावना झाल्या आमच्या
पाचशे हजाराच्या नोटा
काळा पैसा शोधण्यामध्ये
वेळ गेला वाया
गोरगरिबा छळून तुम्ही
किती जमवली माया
हातावरच्या पोटासाठी
लागल्या मोठा रांगा
रांगेत उभा गडगंज श्रीमंत
एक तरी सांगा
तुमचा झाला फायदा
पण आमचा झाला तोटा
भावना झाल्या आमच्या
पाचशे हजाराच्या नोटा
बळीराजाच्या घामाला
भाव नाही मिळाला
सडला सारा भाजीपाला
अन् जमिनीने गिळला
दुष्क
ाळाच्या आगीनंतर
पावसानं दिली साथ
जिद्दीने पुन्हा उठण्यापूर्वीच
तुम्हीच केला घात
अन्नदात्या बळीराजाला
कधी करणार मोठा
भावना झाल्या आमच्या
पाचशे हजाराच्या नोटा
लक्ष्मी ठरली इथे
फक्त कागदांचे तुकडे
मल्ल्या गेला पळून
तेव्हा काय केलेत वाकडे
गरीब आणि श्रीमंतीचा
कधी मिटणार इथे भेद
नोटांवरच्या बापूंनाही
तुमचा वाटत असेल खेद
तुम्हीच पोसलेल्या भ्रष्टांचा
आधी बाहेर काढा साठा
भावना झाल्या आमच्या
पाचशे हजाराच्या नोटा