पहिलं वहिलं प्रेम
पहिलं वहिलं प्रेम


अनोळखी चेहरा जेव्हा
हृदयास देतो दस्तक
अलगद मनात बसतं
एक प्रेम नावाचं पुस्तक
नजरेच्या खेळाचा
सुरु होतो लपंडाव
नुसतं तिच्या बघण्यानं
होतो काळजावरती घाव
नजरेला हवं असतं
तिचं रोज रोज दिसणं
सवयीचं होतं आता
एकटं एकटं हसणं
मनातल्या भावना
मनातच राहतात
एकतर्फी प्रेमाचे
गीत मात्र गातात
दिवस जातात सरून
पण होत नाही व्यक्त
ती होते दुसऱ्याची
अन आठवण येते फक्त
भले एकतर्फी असतं
नसतं मुळीच सेम
खरंच लय भारी असतं
पहिलं वहिलं प्रेम