हसत रहा
हसत रहा

1 min

531
आनंदाचे, उल्हासाचे अमृत तू शिंपीत रहा
हसत रहा तू सदा अशी मन माझे जिंकित रहा
तुझी पाहता प्रसन्न मूर्ती
क्षणात माझी दुःखे सरती
श्रावण सर होऊनी अंगणी
उन्हातही भिजवित रहा...,१
नवरंगाचे हास्य रसा चे
कारंजे नीत थुई ठुई नाचे
दो नयना नाच्या रम्य उपवानी
झुळ्याविना झुळवीत रहा...२
ओठ हास् ती हसतील डोळे
जादुगिरी ही मजसी नकळे
प्रीत मधाचे भरले पोळे
मकरंद तू देत रहा...३
जरा लाजरी, अबोल बुजरी
मूर्ती तुझी ह्या मनोमंदिरी
स्नेहलता तू मृदू हास्याचा
पारिजात फुलवीत रहा....४