सकाळ आली दारी
सकाळ आली दारी


काळोखाची विरून गेली जुनी
किल्मिषे सारी उन्हे शिरी खोऊनी
सकाळ आली दारी.......
एक अनोखा गंध हवेला,
पान फुलावर नवा तजेला
पखरण चुंबिती प्राजक्ताची
तिची पाऊले गोरी.....,१
तिचीच जादू तिला कळेना
पाय येथुनी तिचा निघेना
दिसते सुंदर स्वप्ना हून ही
निसर्ग शोभा न्यारी.....२
जणू सोन्याने तिने मधवली.
ह्या गावाची अलका नगरी
धुंद मनाचा यक्ष पाहतो
अरुण -प्रभा सोनेरी.....३