मम्मी माझी सर्व्हिस करते
मम्मी माझी सर्व्हिस करते


मम्मी माझी सर्व्हिस करते
कधी न आळस वां कंटाळा
कधी न ती थकते.....
माझी मम्मी ,माझी आई......
सकाळ पासून तिची धावपळ
येते कोठुनी अंगी तिच्या बळ
काम काम अन् कामच करते
कधी न ती निवांत बसते.....१
घरात नसती माझे बाबा
गावी असता आजी आजोबा
घरी सारखे फोन करूनी ती
चौकशी माझी करते....२
ती कपड्यांना इस्त्री करते
दप्तर डबा ही भरुनी ठेवते
उर्शिर झाला निघते आत्ता
तोंडाने ती पुटपुटत असते...३
सगळ्या आया अशाच असती
मुलांवरी ज्या माया करी ती
म्हणून लाडकी आई मला
मनपासूनी आवडते
मम्मी माझी सर्व्हिस करते.....४