रंगभूमी या जगाची
रंगभूमी या जगाची


रंगभूमी या जगाची अभिनयाची ही कलारंग रेषा जुळवितो मी भावनेचा कुंचला...
भूमिका जगल्याविना येत नाही जगविता
अभिनयाविन आणि त्यांना ये नाही सजविता
भाग्य माझे थोर म्हणुनी ही कला लाभे मला...१
चित्रातली दुनिया निराळी त्याहुनी न्यारे जगावे
मोह नगरीच्या तळ्यातच कमल आत्म्याचे फुलावे
रंगवितो दोन विश्वे रंग माझा वेगळा...२
उगवे कलेची चंद्रिका संपते जेथे जिने
रंग चढता चेहऱ्याला नाही तिथे काही उणे
संपता पण भूमिका ती मी कले माझा मला..३