गायिलेस तू गाणे
गायिलेस तू गाणे


सळसळे गं बन माडांचे डोलत आनंदाने नभात येता चांद बिलोरी गायिलेस तू गाणे...
तू सह हसलीस गाली
क्षितिजावर संध्या आली
गीत ऐकता तुझे विसरली ती ही रंग बहाणे...१
फेन धवल लाटांचे नर्तन
भुंग्यापरी वाऱ्याचे गुंजन
मनात माझ्या फुलून आले सुखद स्वप्न चांदणे...२
भिरभिरले ते तांबूस पक्षी
जणू प्रितीला आपुल्या साक्षी
तुझ्या सुरांनी विश्व उभविले अपुले लोभसवाणे...३