वय माझं सोळा (लावणी)
वय माझं सोळा (लावणी)


गल्लीमधली पोरं मारिती मला पाहुनी डोळा
मला कळेना चललि का ही वय माझं सोळा...
रस्त्यावरुन मी येता जाता
सहज मारुनी जाती धक्का
झुलू लागले अलीकडे मी स्वप्नांचा हिंदोळा.
मनी रेखिते चित्र कुणाचे
खेळ काय की वेड मनाचे?
स्पर्श अनोखे तरी हवेसे वसंत देही आला...२
नजर वेगळी प्रत्येकाची
सवय झाली ग नजर बाणाची
घडतो नंतर नजर भेटीचा नयनरम्य सोहळा...३
किदकी मीडकी पोरं चाभारी
बघुनी त्यांना मीच बावरी
प्रेम करा या लागे हिंमत, ही तर मासा तोळा...४