शौकगीत
शौकगीत
जगायचे प्रीतीस्तव मारणे ही करत
प्रीतप्रीती विण हे जगणे एक असे शोक गीत
चंदनास देई गंध सांगतसे काय कुणी?
फूल नाही सांगत ते शिरी माळ मज रमणी
नकळतच गंधातून भेट तसे मधुप गीत....१
, 0);">मयरासी सांगत का मेघ नाच नाच नाच नाच रे
चंद्र किरण प्यावयास चकोर उंच उंच जात रे
वसंतात कोकीलेस का स्फुरते ते मधुर गीत..२
फुल लपविले तरी सौरभ का तो लपतो?
लपावूनिया प्रीत कधी का येथे कुणी जगतो?
प्रीतीचा अर्थ कुणा सांगता न ये कधीच!