Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Neha Ranalkar

Abstract Children Stories


1.2  

Neha Ranalkar

Abstract Children Stories


सानेगुरुजी सुपुत्र भारत मातेचा

सानेगुरुजी सुपुत्र भारत मातेचा

1 min 403 1 min 403

खरा एकच धर्म अर्पावे प्रेमच ते जगाला|

मातेने शिकवले संस्कारांतून हे ज्याला ||१


सदाशिव पुत्र एकची पांडुरंग रे जन्मला|

साने गुरुजी शोभे यथार्थ नाम हे तयाला ||२


यशोदेचा पुत्र कान्हा पांडुरंग होते अण्णा|

गाता मातेचे मंगल स्तोत्र फुटे प्रेम पान्हा ||३


भारतमातेचा पुत्र होऊनी विसरे ना जन्म दात्रिला|

'बलसागर भारत होवो ' कानमंत्र गीतांतूनच दिला ||४ 


पत्र लिहुनी सुधास संस्कार पाठ नित्य तो पढविला |

धन्य जाहली माता सुपुत्र जिने तुमच्यासम घडविला ||५


हीन दीन पददलितांची मनीं ज्या असे करुणा|

व्हा देशहितास्तव सदैव तत्पर जो सांगे तरूणा ||६


ओठांवर ज्यांच्या थरथरत असे प्रार्थना एक तिच|

कधी न व्हावे भगवान त्यांच्या हातून कर्म नीच ||७


Rate this content
Log in

More marathi poem from Neha Ranalkar

Similar marathi poem from Abstract