STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Comedy

3  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Comedy

नववर्षाचा संकल्प

नववर्षाचा संकल्प

1 min
176

गत वर्ष जाऊनी आले आहे  

नव वर्ष लेऊनी नव संकल्पना |

स्वागत नववर्षाचे करूआनंदाने

आखूयात सुंदर नव कल्पना | |१| |


वाटते पहाटे लवकर उठून जावे

खरंतर रोजच पायी चालत |

पण उठण्याचा येतो कंटाळा मग

बसतो आळसाला भीक घालत | |२| |


एकतरी पुस्तक घ्यावे रोज 

करतो संकल्प नववर्षाचा |

जातो निघून दिवस तसाच

वाट लावितच सार हर्षाचा | |३| |


वाटे संकल्प जाईल पूर्णत्वास 

रोज लवकर झोपी जाण्याचा |

काही केल्या येईना झोप लवकर

छंद जडे मोबाईल पहाण्याचा | |४| |


सा-या संकल्पांची लागते वाट

पुर्णत्वास येण्या आधीच |

आता तर मी करीतच नाही नवे

संकल्प फाडून टाकली यादीच | |५| |



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract