Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Inspirational

3  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Inspirational

दिवास्वप्न ठरू नये

दिवास्वप्न ठरू नये

1 min
160


पहात स्वप्न उद्याच्या आशेवर 

कलियुगी जगतोय प्रत्येक जण |

स्वप्नांच्या दुनियेतले हे स्वप्न वेडे

झपाटून जगतात प्रत्येक क्षण | | १| |


आपल्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी 

अष्टोप्रहर करतात ही खूप श्रम |

कितीही तन मन थकलं भागलं

तरी चुकविना नित्यक्रम | |२| |


अशाच स्वप्नवेड्या,ध्येयवेड्या या

जनांच्या पाठीशी उभा राही देव |

स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी होतसे

सहाय्यक श्रद्धा भक्तीची ठेव | |३| |


स्वप्न वेडे आहेत जगात म्हणून

अशक्यप्राय गोष्टी येतात घडून | 

काळाच्या ओघात कित्येक रहस्य

उकलण्यास्तव आहे दडून | |४| |


नव्या नव्या संकल्पनांना मूर्तरूप 

खरे हेच स्वप्न वेडे असतात देत |

स्वप्न पहावीत जरूर ती दिवास्वप्न 

ठरू नये याची दक्षता घेत | |५| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract