Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Inspirational

3  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Inspirational

नववर्षाचे स्वागत

नववर्षाचे स्वागत

1 min
182


मराठी नववर्षाचे स्वागत होते

गुढी संकल्पांची उभारून दारी |

सडा,रांगोळ्यांनी सजता अंगण

झेंडूतोरण आणते शोभा न्यारी | |


वसंत ऋतूची लागे चाहूल वेली

वृक्षांसह येई आम्रवृक्षास बहर |

मंद सुंगंधीत वारे वाहू लागतात

गातसे कोकीळ पंचम सुस्वर | |


श्रीखंड पुरी नैवेद्य गुढीस चटणी

ती गुळ चिंच कडूनिंब पाल्याची |

जिवनी दु:ख कडूनिंबासम साखर

गाठीचे प्रतिक सुख आल्याची | |


नववर्षाचे स्वागत करूया संकल्प

साजरे व्हावे मराठी उत्सव सण |

ज्ञान विज्ञाना सवे अध्यात्माचीही

धरता कास सुखाचा प्रत्येक क्षण | |


मराठी नवीन वर्षाचे स्वागत आनंदाने व संकल्प पूर्वक कसे करावे हेच या कवितेतून सांगितले आहे.


Rate this content
Log in