STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Classics Inspirational

4  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Classics Inspirational

विषय:- विश्व कवी लेखकांचे

विषय:- विश्व कवी लेखकांचे

1 min
398

विश्व कवी लेखकांचे विश्वात्मक

कधी कधी अणू इतकेच लहान |

दाखवी शत्रूभाव कधी तर कधी  

विश्वबंधूत्वाचे दर्शन घडे महान | |


कधी कधी कल्पनेतील वास्तव तर

 वास्तवातही ते काल्पनिक भासे |

कधी एकामागोमाग दु:खाचे येती

कढ तर कधी सुखात निरंतर हासे | |


विश्व कवी लेखकांचे आध्यात्मिक

करी संस्कृती सुसंस्काराचा प्रचार | 

जाई भरकटत वासनांध अश्लील

अनैतिक संबंधांवर करण्या प्रहार | |


कधी झेपावी उंच अवकाशी तर

कधी सागरतळ काढी ढवळून |

कधी होई शांत योग्याचे लक्षण तर

कधी चंचल पित्त जाई खवळून | |


साहित्याच्या पर्यायाने कवी व लेखकांच्या विश्वात नेमके काय घडत असावे ह्याचा ऊहापोह या कवितेतून करण्याचा मी प्रयत्न केला आहे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract