STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Inspirational

3  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Inspirational

सण दिपावली

सण दिपावली

1 min
191

नावातच दिपावली त्या सणाला

प्रकाशपर्व नसेल तरच नवल |

घरोघरी पणत्या आकाशकंदील

प्रकाशदिवे रांगोळी दिसे धवल | |


वास्तू,दुकाने मंदिर नदीपरीसरात

दिव्यांचा झगमगाट दिसे छान |

विद्युत रोषणाईने न्हाला परीसर

पणतीला असे अग्रभागी स्थान| |


फटाके कुंडी,सुंंसुंद्री,नागगोळी

भरच टाकतात प्रकाशपर्वात |

दिपतात नयन अमावस्येस पा

लक्ष्मीपुजन थाट जास्त सर्वांत | |


उकिरड्यावरही लावती पणती 

महाल झोपडी भेद ना राही |

प्रकाशपर्व असे सण दिपावली

तिथे अंधाराला वावच नाही | |


दिवाळीच्या दिपज्योतींसवे या सणात एक 

आशेचा किरण लपलेला असतो. हा सणच आकाश कंदील पणत्या रांगोळी फटाके या प्रकाशमय वस्तूंनी सजलेला असतो.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract