कुविचारांची करू या होळी
कुविचारांची करू या होळी
दुर्गुणांचा अंत असे सण होळी
प्रतिकात्मक होलिकेचे दहन |
भक्तांसाठी धाव घेई सदा ईश्वर
व्हावयास ते दुष्कर्मांचे दमन | |
होळी सणासाठी पुरणपोळी
घरोघरी केली जाते खास |
होळीत अर्पिता समग्र नैवेद्यास
अग्नित जळता दरवळे सुवास | |
कुविचारांची करू या होळी
धरण्या सद्गुणांची कास |
घरोघरी भक्तप्रल्हाद असावा
देण्या दैवी शक्तीचा सहवास | |
होळी सांगते करा त्याज्य जे जगी
ते सर्व तुम्ही खुशाल मला अर्पण |
सत्कारणी लागण्यास देह समिधा
सद्भाव व प्रेमाचे करा समर्पण | |
