STORYMIRROR

Kalidas Ajegaonkar

Abstract Romance Others

4  

Kalidas Ajegaonkar

Abstract Romance Others

ओयासिस

ओयासिस

1 min
393

मला आवडतं तिचं माझ्यातलं ओयासिस असणं,

आत कुठेतरी धुमसणारी,

गर्द वनात लपाछपी खेळणारी,

मीच माझ्यात तिला लपवायचं,

स्वतःलाच धप्पा देऊन परत राज्य द्यायचं.

काहीच कठीण नाहीये तिला हरवणं,

पण मला आवडतं तिचं माझ्यातलं ओयासिस असणं…


मला आवडतो तिचा गनिमी कावा,

शरीर माझं, वार तिचे,

व्रण नाही, जखमही नाही,

रक्ताच्या थारोळ्यात माझा देह,

कसलं थ्रिलिंग आहे ना हे सगळं,

म्हणून मला आवडतं तिचं माझ्यातलं ओयासिस असणं…


मला आवडते ती वाऱ्याच्या थंड झुळुकेसारखी,

दिसायचं नाही, पुरावा नाही,

फक्त मनाला भुलवायचं,

अस्तित्वाने वेड लावायचं,

आणि स्वतःला मॅड म्हणत,

मी माझंच हसायचं, त्यालाच फसायचं,

शेवटी या क्रूर चेष्टेचीही सवय केली,

पण रोज तसंच घडणं,

म्हणून मला आवडतं तिचं माझ्यातलं ओयासिस असणं…



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract