Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Kalidas Ajegaonkar

Tragedy

4.8  

Kalidas Ajegaonkar

Tragedy

निखारे

निखारे

1 min
441


रोज रात्री स्वप्नातला,

तू मला आवडू लागतोय,

कधी कधी हातात गजरा,

फारच मूड झाला आणि,

शनिवारची रात्र असेल,

हातात वाईनची बाटली असते,

रविवारी सकाळी दोघे उशिरा उठतोय,

रोज रात्री स्वप्नातला,

तू मला आवडू लागतोय…


आपण बेडवर चक्क गप्पा मारतोय,

तुझ्या मांडीवर डोकं,

तुझा हात माझ्या केसांत,

भविष्याचे चित्र रंगवत,

ऑफिसच्या त्राग्याने,

फारच कनवाळून आल्यावर,

तुझ्या गालांवर माझ्या,

लिपस्टिकचा डाग दिसतोय,

रोज रात्री स्वप्नातला,

तू मला आवडू लागतोय…


हल्ली खुपच झोपते मी,

अशी तुझी तक्रार असते,

ओरडतोस, तणतण करतोस,

मी फोनची वाट बघत उपाशी असते,

तू मात्र अबोला धरतोस,

दारू काय ढोसतोस,

अनेक रात्री चरफडत मी,

बेडच्या अगदी कोपऱ्यावर असते,

कडेलोटाच्या तयारीत आणि मग हळूच,

माझी मान वळते,

विद्रोह मी उशीत भरते,

तिला अजून मऊ करते,

सकाळी उशीवर माझ्या ओलावा जाणवतोय,

रोज रात्री स्वप्नातला,

तू मला आवडू लागतोय,


आता पूर्वीसारख्या गप्पाही होत नाहीत,

तुझ्या रातराणीला तू फुलवत ही नाहीस,

मनातले निखारे, तसेच मनात,

गरम होत राहतात,

आठवणींची राख उठते,

डोळे चणचण करतात,

ओठ सुकून जातात,

काळोखातला तुझा स्पर्श,

ओरखडे ओढतो अंगावर,

मी रक्तबंबाळ होत तुझ्याच बाजूला असते,

तुझं रक्त थंड, माझं गरम,

तापमान नॉर्मलला येतं,

म्हणून रोज सकाळी उशीर होतोय,

कारण, रोज रात्री स्वप्नातलाच,

तू मला आवडू लागतोय…


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy