STORYMIRROR

Kalidas Ajegaonkar

Abstract Others

4  

Kalidas Ajegaonkar

Abstract Others

पानगळ

पानगळ

1 min
363

ऐक ना!

मी काय म्हणतो,

ती पानगळ आपण बघायला जाऊया का?

म्हणजे तुटण्याची भीती,

आपल्याला उरणार नाही,

काही वेळा दुसऱ्याच्या अनुभवावरून शिकावं म्हणतात,

त्या झाडाखाली सोबतीने अख्खा दिवस घालवू,

त्याला वाटेल त्याला साथ मिळालीये,

पण पानगळीच दृश्य बघूनच,

लगेच परतीच्या प्रवासाला लागू,

नंतर त्या दिशेला फिरकायलाही नको,

त्या झाडालाही सोबतीचं आमिष नको,

खाली लोळणारी,

दोन पानं,

आपण घरी फ्रेम करून लावू,

म्हणजे तुटण्याची भीती,

उरणार नाही आपल्याला!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract