काही प्रश्न
काही प्रश्न
1 min
163
तू, मी हा वेगवेगळा भेद कशाला?
श्वासांच्या आशेला छेद कशाला?
तुला मला बोलायला, हे शब्द कशाला?
नजरेच्या आकांक्षेला, हे प्रारब्ध कशाला?
वाहत जा वाऱ्यापरी, भीतीने कोंडमारा कशाला?
सरळंसगळं शोधायचं, डोळ्यांनी हा इशारा कशाला?
बाहेरचंच ऐकायचं आहे, आतला आवाज कशाला?
समजू, समजेल, समजतंय, हा गैरसमज कशाला?
बघायचं नाही आत, मग तो आरसा कशाला?
अजूनही असेल गोंधळच जर, 'आपण'चा विपर्यास कशाला?
विसरायचंच आहे सगळं, उगाच आठवायचं कशाला?
सगळंच हवंय परत, पावसाला पाठवायचं कशाला?
