STORYMIRROR

Kalidas Ajegaonkar

Abstract Tragedy

4  

Kalidas Ajegaonkar

Abstract Tragedy

स्वप्ने

स्वप्ने

1 min
368

'खूप होतं का रे,

आपल्या स्वप्नांचं ओझं?

आता पार अगदी,

त्या सगळ्यांची धूळ झालीये,

पण एक सांगू,

आजही त्या स्वप्नांचा सुगंध,

दरवळतो माझ्या नाकपुड्यांत,

उभं करतो मला,

अजून स्वप्ने,

बघण्यासाठी, बांधण्यासाठी,

पूर्ण करण्यासाठी, स्वच्छंद उडण्यासाठी,

थांब, तू पण डोळे मिटून घे,

आणि बघ काही दिसतंय का?'

"अरे मग,

दिसतात ना मलाही स्वप्न,

कित्येक दिसतात,

लोकलमध्ये लटकलेले

सिगरेटच्या धुरात विरलेले,

बियर पिऊन बाथरूममध्ये सोडलेले,

खूप दिसतात,

पण जागेपणी, सताड डोळे उघडे असताना,

जाणिवा, संवेदना शून्य असताना,

मी तलावाच्या काठावर ऊभा राहून,

पाण्यात दगड मारून वलय निर्माण करतो,

तेव्हा ही स्वप्न दिसतात,

पण घरी आल्यावर,

मी मरून पडतो गं,

कारण,

माहीत असतं,

उद्या सकाळी घड्याळात शार्प 8.30 च्या शापाने,

पुन्हा जिवंत व्हायचं असतं,

सगळं तेच तेच करायचं असतं,

म्हणून तुला आपल्या स्वप्नांत अंतर दिसत असेल,

पण मी स्वप्न बघतो..."


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract