STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational

4  

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational

देवा तुझ्या द्वारी आलो

देवा तुझ्या द्वारी आलो

1 min
2

*देवा तुझ्याच द्वारी आलो*
 सोसूनी ऊन पाऊस सोसाट्याचा वारा चाले अविरत वारी विठू भेटीस माहेरा हवे तेवढेच खावे मुक्कामासी निजावे नाम नित्य घ्यावे भजन कीर्तनी रिझावे ध्यास मनी एक चुकू नये पंढरीची वारी पूर्वापार चाले नेम जावे विठ्ठलाचे द्वारी सुकुमार सावळा शोभे गळा तुळशीहार दैन्य विकार दु:ख करी श्रीहरी तडीपार राजस लोभस रुप प्रेमाने साठवित मनी संत तुकोबा संगे ध्यानस्त होई संत जनी कळस भक्तीचा तुका ज्ञानदेव रची पाया निवृत्ती सोपान बंधू बहिण मुक्ता देई माया चोखामेळा सेना नामा गोरा नरहरी सोनार सखू बहिणाबाई कान्होपात्रेचे दर्शन होणार ओठी भारुड नाथांचे फुले सावत्याचा मळा हरीपाठ ज्ञानाचा तुक्याचे अभंग गाई गळा प्रशस्त करीते मार्ग वारीचा ज्ञानेश्वरी गाथा होऊ भोई पालखीचे श्रद्धेनं टेकवून माथा भवसागरी बुडता जीवन नौका करी रे पार व्यर्थ रमलो संसारी नाम तुझेच तारणहार देवा तुझ्या दारी संत येती आम्हीच रे पामर पाप घेई पदरात घाली भीक चुकली पाखर नांदो ऐक्य देशात सांडो भेद जातीधर्मांचा प्रेम सहकार्य क्षमा व्हावा संग्रह सत्कर्मांचा षड्रीपुंचे दमन हाची तुला अभिप्रेत उपवास नियंत्रणात इंद्रिय त्यांचे कधी न व्हावे दास समृद्धी शांती समाधान ऐश्वर्य राहो देशात देशविघातक शक्ती परतूनी लावी रे वेगात नैसर्गिक आपत्ती बेरोजगारीने त्रस्त जनता भारताची वाढली चिंता सत्वरी धाव अनंता भ्रष्टाचारी बलात्कारी देशद्रोही माफिया गुंड काढूनी धींड होऊनी कल्की छाटी देवा मूंड देवा तुझ्याच द्वारी आलो होऊनी भिकारी देई भिक्षा प्रेमाची जाळूनी नजरा विखारी
 
© सौ. नेहा रवींद्र रनाळकर (नवटे)नाशिक


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational