STORYMIRROR

Shila Ambhure

Children

3  

Shila Ambhure

Children

हत्तीचे रूप

हत्तीचे रूप

1 min
1.0K




ससोबा आमचे भित्रे

छान काढायचे चित्रे.

जेव्हा भरायचे रंग

सारे रंगायचे अंग.


काम पाहुनि सशाचे

फुलले मन हत्तीचे.

मला जर दिला रंग

शोभेल माझेही अंग.


मागणी केली हत्तीने

तयारी केली सशाने.

ससोबाने रंगवले

हत्तीला सजवले.


पाहून नवेच रूप

हत्ती आनंदला खुप.

गंमत घडली तेव्हा

पाऊस आला जेव्हा.


भिजले हत्तीचे अंग

निघाले सारेच रंग.

हत्ती झालाच निराश

कसा बसला उदास.


सशाने मग समजाविले

मूळ रूपच सुंदर अपुले.

मूळ रूपच सुंदर अपुले.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Children