रेनकोट
रेनकोट
रेनकोट नाव माझे
आहे साधाभोळा.
पावसात न्हायचा
छंद माझा वेगळा.
एकट्याने बसून
आला होता कंटाळा.
करेन आता मजा
सुरु झाला पावसाळा.
पावसात भिजून मी
होतो चिंब ओला.
तरीही होत नाही
कधीच सर्दी मला.
आई ना रागवते
तुमची मला जरा.
पावसाळ्यात मी
मित्र तुमचा खरा.
संपता पावसाळा
होतो मी हताश.
आई ठेवते बाजूला
मन होई उदास.
शत्रू वाटतात मला
हिवाळा, उन्हाळा.
वाट बघत बसतो मी
येईल ना पावसाळा.
