परी ( बालकविता )
परी ( बालकविता )
1 min
427
परी ग परी
ये ना माझ्या घरी
देते ग मी तुला
ब्ल्यू वाली कॅडबरी....
दोघी जणी मिळून
किचन आपण सजवू
सर्वांना जेवन बनवता
मातीत खेळून घेवू.....
होमवर्क करतांना
स्टार असे मिळवू
आई बाबांची आपण
गुड गर्ल होवू....
तुझी माझी फ्रेंडशीप
सिक्रेट असे राहील
तू दिसशील फक्त मला
दररोज भेटायला येशील...
