स्वप्न (अभंग रचना)
स्वप्न (अभंग रचना)


रात्री झोपतच । सुखांत असता ।
भय दाखवता । स्वप्न असे ॥ १ ॥
झोपू न देणारी I वेड लावणारी ।
ध्येय गाठणारी I स्वप्न अशी ॥ २ ॥
स्वप्नांची पूर्तता । आनंदी आश्रुंचा ।
गाली ओघळाचा । क्षण असा ॥ ३ ॥
स्वप्नांची रांगोळी । होवू नये कधी ।
पहाटव्या आधी । उठू नये ॥ ४ ॥
किशोर मागणे । स्वप्नांत रंगावे ।
स्वप्नात जगावे । स्वप्नावत ॥ ५ ॥