STORYMIRROR

Aparna Chaudhari

Drama

3  

Aparna Chaudhari

Drama

ती

ती

1 min
413

तिच्या वागण्याचीच ही बात आहे

तिन्ही सांज होताच ती वात आहे


उरीच्या कपारीत अंधार वाही

दिव्याच्या उजेडात ती गात आहे


निराशा मनाची झुगारून सारी

नभातून पक्षी पुढे जात आहे


मघाच्याच मस्तीत गुंगून सारे

तरी वेदनेला जरा घात आहे


अबोली कळीतून ना गन्ध वाहे

असे काय सौन्दर्य शापात आहे


शराबी कसा मी पिणारच बोले

नशा जीवनाची तुझ्या आत आहे



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama