गव्हाळंमूगाळं
गव्हाळंमूगाळं
1 min
175
काय सुगरण सून
रांधे गव्हाळे मुगळे
हंडा चुलीवर चढे
त्यात आधण उखळे
गव्हाळ मुगाळ
दोन रंगांची वासरे
गव्हा मुगाच्या धान्याला
वेडी तिथंच विसरे
केली वासराची भाजी
सासूला गं दुःख झाले
आर्त हाक मारताच
दोघे भेटावया आले
गव्हाळ्या मुगळ्याची
माय दारात हंबरे
द्वादशीच्या सांजवेळी
गाय वासरू पुजले
