दिवाळी
दिवाळी
1 min
418
अशी दिवाळी काशी दिवाळी
खमंग आणिक गोड दिवाळी
चकलीगत कुरकुरीत अन्
कधी पेढ्याहून मऊ दिवाळी
बालपणीची खट्याळ मस्ती
तरुणाईही सजतीधजती
आई आणिक ताई साऱ्या
फराळ रुचकर बघा रांधती
अशी मजेची मस्त दिवाळी
दीपमाळ ही अंगणी सजली
रंग रांगोळी खुलून गेली
धूप दिपच्या सुगंधातया
गंध फटाक्याचाही मिसळी
किती उधळती गंध दिवाळी
पहाट थंडी मुकी गुलाबी
चोरुनी होती नजरानजरी
प्रीत मनीची इथे फुलवी
अशी सुखाची धुंद दिवाळी
नातीगोती भेटीगाठी
सासर सारे छान कितीही
असे नकळे काबर होई
माहेर तेव्हा मनी आठवी
मनात माझ्या गुंग दिवाळी
