STORYMIRROR

Aparna Chaudhari

Others

4  

Aparna Chaudhari

Others

मी होते तेव्हा अबोध बाला

मी होते तेव्हा अबोध बाला

1 min
472

मी होते जेव्हा अबोध बाला

बालपणीचा केला चाळा

हट्ट करुनी सदा कदाही

मी मागत असे मोती माळा

मी होते तेव्हा अबोध बाला


शाळा माझी सरली आता 

सुरू जाहल्या कॉलेज खेपा

सगळ्यांचा मग एकच हेका

"कन्या आली हो लग्नाला....!"

मी होते तरीही अबोध बाला


संसाराचा ओढीत गाडा

शोध स्वतःचा घेता घेता 

तरीही वाटे सदा मनाला

मी आजही आहे अबोध बाला


उदरी मुलगी आली माझ्या 

पाहू लागले तिच्यात मजला

तेव्हा सारा खेळ उमगला

मी नाही आता अबोध बाला



Rate this content
Log in