STORYMIRROR

Aparna Chaudhari

Others

3  

Aparna Chaudhari

Others

पावसाचा गार वारा

पावसाचा गार वारा

1 min
424

पावसाचा गार वारा

नकळत मन सुखावणारा

श्रावणातील झुल्यासारखा

आभाळवर झुलणारा

पावसाचा गार वारा...

वैशाखातील वणव्याला

हळूच फुंकर घालतो

कोमेजल्या वल्लींना

नव पल्लवी देतो

रखरखत्या वसुंधरेवर

मंद सुगंध पसरवणारा

पावसाचा गार वारा...

पाऊस म्हणजे अमृतधारा

ओठांवरती ओघळणारा

इंद्रधनूच्या रंगमधले

खेळ नवे दाखवणारा

हा तर आहे प्रीत परवा

मनास माझ्या झुरविणारा

पावसाचा गार वारा...

निरभ्राच्या डोळ्यामधली

ही तर सुंदर काजळ रेघ

क्षितिज सागरी डोंगर माथी

कोसळणारे काळे मेघ

संथ सागरी पाण्यावरती

तरंग नवे उमटविणारा

पावसाचा गार वारा...



Rate this content
Log in