STORYMIRROR

Aparna Chaudhari

Others

4  

Aparna Chaudhari

Others

परिक्रमा

परिक्रमा

1 min
319

सोनसावळ्या त्या लालीचा

मळवट भरुनी भाळी

आरक्त केशरी तेजस्वी ते

कुंकू कोरीव लावी

तिन्ही सांजेचे शृंगारातून

रूप मनोहर फुललेले

सांग कुणाच्या भेटीसाठी

मन हे आसुसलेले

पश्चिमेच्या नयनामध्ये

काळोखाने काजळ भरले

अन् क्षितीजाच्या बाहूने

हळूच तिजला कवेत धरले

क्षणात सारे मळवट कुंकू

पश्चिम क्षितिजी पसरे

मनास आपुल्या भावून जाते

रूप सांजेचे बुजरे

पुन्हा नव्याने वधू नाहली

तेच मळवट कुंकू ल्याली

पश्चिमेच्या क्षितिजासाठी

परिक्रमा ही करू लागली


Rate this content
Log in