बंध रेशमाचा
बंध रेशमाचा
1 min
180
तुझे सुख जेथे
तिथे मी सुखावे
तुझे श्वस जेथे
तिथे मी विसावे
तुझे शब्द जेथे
तिथे मी नमावे
तुझे पाय जेथे
तिथे मी झुकावे
तुझे शब्द सारे
मला वेधणारे
तुझे हर्ष सारे
मला जाळणारे
तुला चांदणे जे
मला ऊन होते
मुक्यानेच मी घाव
वेचीत होते
उरीचे उसासे
लपवीत होते
चित्कार अंतरीचे
दाबीत होते
का बांध ऐसा
उखडीत नेला
जखमी तिथे तो
किनाराच होता
महापूर हा
भावनांचाच होता
तया ना कुणाचा
अडोसा मिळाला
तिथे पथ्थराला
ना शोक होता
ओशाळल्या जरी या
लाटा पुराच्या
पुन्हा अंतरी त्या
झाकून गेल्या
ओल्या किनारी जखमा
तैशाच राहील्या
मार्गस्त तो प्रवाह
वाटे जरी सुखाचा
एकलाच अंती
तो बंध रेशमाचा
