STORYMIRROR

Aparna Chaudhari

Abstract Fantasy

4  

Aparna Chaudhari

Abstract Fantasy

वारा

वारा

1 min
381

फिरून फिरून दमल्यावर

विसावलो एका झाडावर 


पण त्याचीही हालली पाने 

अन् पुन्हा एकदा 

वाहू लागलो मी वेगाने 


क्षणभर एका घरात शिरता 

चिडली मजवर दारे-खिडक्या 

थडथडती त्या अति रागाने 

अन् पुन्हा एकदा 

वाहू लागलो मी वेगाने 


सागर शैयी निजू पाहता 

त्याची लगबग सुरूच झाली 

कर लाटेचे उठले क्रोधाने 

अन् पुन्हा एकदा 

वाहू लागलो मी वेगाने 


डोंगरमाथी जाऊन जेव्हा 

साथ तयाची मागत होतो 

मजला लोटी तो त्वेषाने 

अन् पुन्हा एकदा 

वाहू लागलो मी वेगाने 


थकून पाय ओढीत होतो 

हताश झालो त्या खेदाने 

अन् तेव्हा मजला 

रोखून धरले त्या मेघाने

वाहू न शकलो मी वेगाने


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract