गृहिणी
गृहिणी
बोलता येत असताना ही
मुकी राहते ती गृहिणी
ऐकू येत असताना ही
कानाडोळा करते ती गृहिणी
दिवसभर काम करून ही
काय काम करते हॆ शब्द
निमूटपणे सहन करते ती गृहिणी
तिच्या सूग्रणीला नाव ठेवले
तरी का असा प्रश्न
विचारत नाही ती गृहिणी
कुटुंबाच्या मागे धावताना
दमली तरी वेदना कुणाला
दाखवत नाही ती गृहिणी
इतरांसाठी झिजताना
स्वतःचं अस्तित्वच
विसरून जाते ती गृहिणी
सर्वांच्या गरजा भागवताना
स्वतःच्या गरजा
-हदयात लपवते ती गृहिणी
प्रत्येकाच्या आवडी जपताना
तिच्या आवडीची
कुणी कदर करत नाही ती गृहिणी
सर्वांचे स्वप्न पूर्ण करताना
स्वतःचे स्वप्न सारे
अर्धवट सोडते ती गृहिणी
दिन रात राबत असताना सुध्दा
फक्त गृहिणीच आहेस का ?
या प्रश्नाचं उत्तर शोधते गृहिणी
काम काहीच करत नव्हती
ती होती फ़क्त गृहिणी
शेवटच्या श्वासात ही एवढेच
ऐकून जाते ती गृहिणी
