संसार
संसार
1 min
243
अरे संसार संसार
नाही यात रे विसावा
घडीभर थकूनही
चालताना रे दिसावा.....
पहाटेचा सडा अनं
नक्षीदार हो रांगोळी
घरामध्ये आनंदाने
नांदतात हो सगळी...
शिवारात धन्याला ही
न्याहारीची होई घाई
नाही गेली वेळेवर
तर रुसतो गं बाई.....
धनी माझा रानामंधी
पहा राबे दिनरात
संसाराच्या वेलीवर
सदा देईन मी साथ....
गाडा हाकण्या संसारी
हवे दोन जोडी चाक
खाऊ चटणी भाकरी
कुणा नाही मागू भीक....
सुख दुखःचा परडा
हिंमतीने हो सांभाळू
करू संसार सुखाचा
नातं दोघांचं मायाळू.....