STORYMIRROR

Sushama Gangulwar

Abstract

3  

Sushama Gangulwar

Abstract

अशी असावी कविता

अशी असावी कविता

1 min
222

मनातील भावनांना 

लेखणीचा रंग यावा 

शब्दात उतरवताना 

आनंद द्विगुणित व्हावा.......


शेतकऱ्यांची व्यथा 

कवितेत रेखाटताना 

यावे अंगास काटा 

दुःख त्याचे मांडताना........


चिंब चिंब पावसात 

प्रियकराची वाट पाहताना 

अंगा यावे शहारा 

प्रितीचे भाव सांगताना........


आईच्या प्रेमाची 

कल्पना करताना 

कुशीत तिच्या सारे 

जग विसरून जावे.......


मैत्रीचे नाते मांडताना 

कवितेशी मैत्री व्हावा 

लेखणीतील प्रत्येक शब्दाला 

मैत्री गत मोल यावा......


स्वप्नातील कल्पनेला 

शब्दांची भरारी द्यावे 

कवितेच्या स्वरूपात 

मन आनंदाने गावे.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract