STORYMIRROR

Sushama Gangulwar

Tragedy

4  

Sushama Gangulwar

Tragedy

वेळी अवेळी

वेळी अवेळी

1 min
506

या गं कातरवेळी नी सांजसकाळी 

आठवांचा पूर बरसे वेळी अवेळी !!धृ!!


दिवस रात्र तुझ्याच आठवणीत मी झुरते 

ही रात्र अशी काळी तुझ्या विना ना सरते 

मी वाट पाहते तुझी रे बेधुंद कळी 

आठवांचा फुल बरसे वेळी अवेळी...1


नदी किनारी तुझ्या मिठीतले ते क्षण

कसे विसरेल रे तुला माझे हॆ मन 

आज ही तिथे वाट पाहते मी संध्याकाळी 

आठवांचा पूर बरसे वेळी अवेळी...2


का दूर गेला तू आजवर ना कळाले 

माझ्या प्रश्नांचे उत्तर मला ना मिळाले 

शोधते तुला ही सुन्न रात्र काळी 

आठवांचा पूर बरसे वेळी अवेळी...3


दाटले अंधार माझ्या नयनात 

घर करून राहिला तू सदैव माझ्या मनात 

स्वप्न तुझेच पाहते मी कातरवेळी 

आठवांचा पूर बरसे वेळी अवेळी...4


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy