STORYMIRROR

Sushama Gangulwar

Tragedy Others

3  

Sushama Gangulwar

Tragedy Others

ऋतू रंग जीवनाचे

ऋतू रंग जीवनाचे

1 min
157

ऋतूरंग जीवनाचे 

सख्या कसे बदलले 

तुझा सहवास सांग 

अचानक का सुटले?.......


ऋतूरंग जीवनाचे 

किती भयानक भासे 

तुझ्या विना सांग सख्या 

जगु मी आयुष्य कसे?......


तुझ्या सवे जीवनाचे 

ऋतूरंग मी पाहिले 

क्षण आयुष्याचे सख्या 

फक्त तुलाच वाहिले.....


ऋतूरंग जीवनाचे 

गेला सोबत घेऊन 

बेरंग जगणे माझे 

बघ एकदा येऊन......


ऋतूरंग जीवनाचे 

तुझ्या जाण्याने विजले 

तुझ्या शिवाय जीवनी 

माझ्या काहूर माजले....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy