STORYMIRROR

Sushama Gangulwar

Romance

3  

Sushama Gangulwar

Romance

विश्वास ठेव

विश्वास ठेव

1 min
515

आज कॉलेजचा शेवटचा दिवस 

पण मला वाटतं तू सोडून नको जाऊस....


तू गेल्या नंतर तुझी खूप आठवण येईल 

परत परत फोटो तुझा काढून पाहील....


तुला भेटण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन 

तुझ्या गावातून मी एकदातरी फिरेन.....


तुझ्या सोबतच्या सर्व क्षणांना कैद करून ठेवेन 

माझ्या रूमच्या प्रत्येक कोपऱ्यात आपला फोटो लावेन...


तुझ्या प्रेमात वेडा मी रोज उठून बघेन 

तू सोबत जरी नसली तरी फोटो बघून जगेन...


मी सेटल झालो की तुझा विचार नक्की करेन 

आपल्या दोघां बद्दल घरी स्वतः बोलेन 


तुला मागणी घालण्यास तुझ्या घरी येईन 

तुला सोबत घेऊनच मी परत जाईन...


फक्त माझ्यावर विश्वास ठेवून तू वाट पहा 

मी येत नाही तो पर्यंत घरच्यांना टाळत रहा....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance