उरलेले क्षण
उरलेले क्षण
सरले गं जीवन संगीनी दिवस आपले
आता संसारातून घेऊ आपण विसावा
तू माझ्यासाठी आणि मी तुझ्यासाठी
अन्य कुठलीच काळजी आपणास नसावा....
नको लाऊन घेऊस गं तू जीवाला
कुठल्याच गोष्टींचा आयुष्यात घोर
बघतील पुढचं हवं ते सगळं
आता मोठी झालीत गं आपली पोरं.....
आपण दोघं निवांत क्षणी कुठेतरी
निसर्ग रम्य वातावरणात जाऊन बसू
संसारातील गंमत जमत आठवून
एकमेकांच्या संगतीत खूप-खूप हसू.....
वेळच नव्हता गं एकमेकांवर रुसायला
आता तू मनसोक्त माझ्यावर रुसावे
तुझ्या वेणीत प्रेमाने गजरा माळत
सखी मी तुझा अबोला क्षणात दूर सारावे..
आपल्या जीवनातील दुःख सगळे
आपण सोबत मिळून मागेच सोडून देऊ
फक्त आनंदाच्या प्रत्येक क्षणाला
तू आणि मी दोघही नव्याने जगून घेऊ.....
आता आपण फक्त नातवंडा बरोबर
नाचू,गाऊ आणि मौज, मजा करत राहू
आयुष्याच्या शेवटच्या श्वासा पर्यंत
एकमेकांच्या दुखण्या खूपण्याकडे लक्ष ठेवू ......

