दिवास्वप्न
दिवास्वप्न
तुझ्यासवे जगण्याचे रोज
दिवास्वप्न रंगवत आहे
थोडे सुख थोडे दुःख
सारे मनचेच ठरवत आहे...
लटकेच रुसवे फुगवे नुसते
समजावण्याचा खेळ आहे
तुझ्या नि माझ्या मिलनाचा
अजुनी कुठे मेळ आहे...
जवळी नसता प्रिये तु
असल्याचा आभास आहे
व्हावे खरे दिवास्वप्न हे
एवढीच मनाला आस आहे...

