तु कोण आहेस...
तु कोण आहेस...
तु कोण आहेस
हे स्वतःच ओळख
दुसऱ्याच्या सांगण्याने
ठरवु नकोस...
स्वतःचा आनंद
स्वतःच शोध,
कुणी आनंद देईल
याची वाट पाहु नकोस
स्वतःच स्वतःचा
आदर कर,
कुणी आदर करेल
अपेक्षा ठेवु नको...
सुख असो वा दुःख
कुणाला बोलु नकोस
वाटेकरी कुणी नसतं
हसं करुन घेऊ नकोस...
बाई म्हणुन जन्म तुझा
तुला सारं जपायचयं
पण त्या आधी तुला ही
एक माणुस म्हणुन जगायचयं...
