गाथा माय मराठीची...
गाथा माय मराठीची...
1 min
304
गाथा माय मराठीची
त्या मराठी शाहिरांची
पहाडी आवाजाची अन
धगधगत्या इतिहासाची
मराठी भाषा नव्हे फक्त
आहे आपुला तो स्वाभिमान
छाती ठोक गाऊया सारे
मराठीचे गौरव गान
इंग्रजी म्हणे दुध वाघीणीचं
आपणच केलं पाहीजे गड्यांनो
कौतुक माय मराठीचं,
भले लेकराला आपल्या
प्रगतीसाठी इंग्रजी शिकवा
सोबतीनं बाळांनो मराठीला टिकवा
धरु नव्याने कास मराठीची
एक तरी ओवी गिरवु ज्ञानेशाची
मनाचे श्लोक पठन करु
आपली मराठी भाषा लेकरांनो
आपणच जतन करु,
डंका मराठीचा जगभरी वाजवू
सातासमुद्रापार मराठी ध्वज लावू...
