STORYMIRROR

Mita Nanwatkar

Romance

3  

Mita Nanwatkar

Romance

मनधरणी

मनधरणी

1 min
328

राग तुझा हा लटका लावतो मनी चटका

बोलशील कधी प्रिये

मोजतो मीच घटका

चुक झालीच माझी

मान्य आहे मजला

भाव मज अंतरीचे

कळत नाही तुजला

तुजं भोवती फिरते

माझे आयुष्य चक्र

सहन होत नाही गं

कुणाचीही दृष्टी वक्र

किती वेळा करू मी

सखे तुझी मनधरणी

कमळपुष्प प्रेमाचेच

अर्पितो तुजं चरणी

सोड रूसवा फुगवा

हस राणी एकदाच

चेहरा घेवून हातात

आतुर नयन तू वाच

घे गं उबदार कुशीत

अन् विसर जग सारे

नखशिखांत खुलू दे

प्रीतीचे विझले तारे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance