STORYMIRROR

Mita Nanwatkar

Abstract Romance Classics

3  

Mita Nanwatkar

Abstract Romance Classics

मीच माझ्या प्रेमात

मीच माझ्या प्रेमात

1 min
156

कधी कधी मीच माझ्या

प्रेमात  अशी   पडते

आंतरिक  सौंदर्यापुढे

सारं  जग हे विसरते....


चेहऱ्यावरचे  डागही             

कळीप्रमाणे   खुलते

निर्बंध हास्याचेही या

कारंजे  उडू  लागते....


किरकोळ काया ही 

रेखीव दिसू  लागते

माझ्या अस्तित्वाचेच

चांदणे भोवती सजते...


रूप माझं आगळंवेगळं

मन भरून न्याहाळते 

लोकांच्या टिकांनाही

गजऱ्यासमान माळते...


अशी युवती मनोहर मी

सौंदर्य माझेच  टिपते

स्वगताचंच देखणेपण

मुक्या शब्दांत मांडते


असे अचानक  दर्पणी

अप्रुप  काहीसे घडते

कधी कधी मीच माझ्या    

प्रेमात  अशी   पडते 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract