STORYMIRROR

Mita Nanwatkar

Abstract Romance Classics

3  

Mita Nanwatkar

Abstract Romance Classics

आषाढघन

आषाढघन

1 min
162

ग्रीष्म वणव्याचा, दाह मनी साचलेला

तुझ्या प्रतिक्षेत, हा जीव आसुसलेला

धुके दाटले रेशमी, सभोवती मंद वारा

केकावला मोर रानी, देवून एक इशारा

दिशा‌ या झाकाळल्या, अन् धुंद गारवा

आतुर भावनांचा, जणू श्रावण शिरवा

आर्त साद प्रीतीची, क्षितिजावर घुमली

आषाढघनांची आरास, नभात सजली

दाटून आले ढग, आभाळी काठोकाठ

कळली तया ओढ, माझ्याही पाठोपाठ

होती किती कोरडी, काया भेगाळलेली

तप्त वेदनेत त्या, मुख कांती हरवलेली

आषाढघन होवूनी, बरसूनी तू आलास

अतृप्तीची आग, सरींनी शमवून गेलास


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract