अमृततुल्य मराठी
अमृततुल्य मराठी
मायबोली माझी सुंदर
ही अमृततुल्य मराठी
गहिवरल्या भावनांना
जणू आधाराची काठी
कधी लयदार ठसका
कधी वऱ्हाडी झटका
मनमोहक वाटे सदा
बाज हिचा नीटनेटका
युगानुयुगे दरवळतोय
अभंग ओव्यांचा थाट
मन:सागरी उंचबळते
हळव्या शब्दांची लाट
सान थोरांना मोहविते
विनम्र नि विनोदी अंग
काळजास या बिलगते
अभिव्यक्तीचे हर रंग
महाराष्ट्राची शान आहे
नि ओठांवरचा ध्यास
समुद्रापार झेपावतोय
हा साहित्यिक प्रवास
मधावानी गोडी तया
अलंकार जडित रूप
धुंद होता भावसरी या
चढे लेखणीस हुरूप