STORYMIRROR

Mita Nanwatkar

Horror Tragedy Thriller

2  

Mita Nanwatkar

Horror Tragedy Thriller

पावसा पावसा

पावसा पावसा

1 min
2

पावसा पावसा

एकदा तरी सांगना

थांबवशील रे कधी

हा खेळ जीवघेणा

कुठे ऊन कुठे पाऊस

कोडं काही सुटेना

विरोधाभासी वागणं तुझं

मजला काही कळेना

गोरगरीबांचा आकांत

तुजवर का पोहचेना

रौद्र असं रुप तुझं

शांत का होईना

आवरावं तरी कसं

उध्वस्त झालेल्या घरांना

घे रे समजून आता

तुझ्या लेकरांच्या भावनांना

कुठे थेंबाथेंबासाठी

शेतकरी तहानलेला

तर कुठे ओसंडून

भयंकर पूर आलेला

तुच थांबव आता

या विध्वंसी वादळाला

घेवू दे रे श्वास

पुन्हा या जीवनाला

दे नवी प्रेरणा

शुन्यातून उभं राहायला

विस्कटलेल्या घरट्यांना

आशेने सावरायला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror